Monday, 9 March 2015
Sunday, 28 August 2011
पाऊस
पाऊस
पाऊस म्हणजे जीवन पाऊस म्हणजे आशा
जीवनाला मिळालेली
नवी एक दिशा //
तुझी आठवण मला
पाऊसासारखीच वाटते
जीवनाला पुन्हा एकदा
जवळून पाहावेसे वाटते //
मंगेश वाडते(आकांक्षीत)
Friday, 26 August 2011
BHAKTI
भक्ती
देव भक्तीचा भुकेला
बोले रागावून मला
का रे तू असा
विसरलास मला //
ऐकुनी त्याचे बोल हे
भारावलो मी
तुझ्या प्रीतीच्या भावनेत
देवाला विसरलो मी //
मला लागली तहान
तुला भेटण्याची आस
चंद्रावानी रूप तुझे
मला पाहण्याची आस //
रागे रागे देवा माझ्या
नको जावूस तू आज
प्रेमामध्ये देवा माझ्या
तुझ्या भक्तीचाच वास //
देव आनंदुनी गेला
म्हणे आहेस तू साधा
जन्मोजन्मी मिळावी
तुला हीच तुझी राधा //--- - मंगेश वाडते ( आकांक्षित )
Tuesday, 23 August 2011
ARCHANA
अर्चना
लाडिक वाळी गोड वाणी
चंचल तेची तू स्वामिनी
अबला न तू असे कामिनी
विद्युलता तू दामिनी //
वाहीशी खळाळत झर्यासवे
सळसळनार्या वार्यासवे
विहारीशी तू आनंदाने
किलबिलणाऱ्या थव्यासवे //
कोमलांगी,सुगंधा
लतिका, मृग्नयाना
तरसली सारी अवनी
फक्त तुझ्या दर्शना //
मृदुभाषिणी तू ललना
पुष्प लता तू अर्चना
सहचारिणी माझी
भेटलीस मज पामराला //----आकांक्षित
SATYA
सत्य
सत्य, प्रेम, परोपकार
सार काही खोटं असत
वास्तवतेतल्या PEDHITAL
सार सोन शुद्ध नसतं //
स्वार्थासाठी आपल्या
सर्वजण एकत्र येतात
स्वार्थ पूर्ण झाल्यावर
गट सोडून निघून जातात //
माझ तुझ्यावर प्रेम आहे
हे वाक्य खर नसतं
स्वार्थ पूर्ण होण्यासाठी
दिलेलं खोटं वचन असत //
अनाथाला दत्तक घेणं
हेच खर प्रेम असत.
दुसऱ्याच्या सुखात सुखी होणं
. हेच खर सत्य असत // ----आकांक्षित
KEVHATARI
केव्हातरी
उत्तुंग शिखरांच्या उंची एव्हडी
माझीही होईल उंची केव्हातरी //
माझेही नाव लोक उराशी बाळगतील
मीही होईन कोणाचीतरी स्फूर्ती केव्हातरी //
सौंदर्याने नटलेल्या, प्रकाशाने उजळलेल्या
माझ्याही असतील इमारती ,केव्हातरी //
मग रस्त्याने जाता जाता सरस्वतीच्या मंदिरी
वाहील फुले हा विद्यार्थी केव्हातरी // ------ आकांक्षित
Subscribe to:
Posts (Atom)
