अर्चना
लाडिक वाळी गोड वाणी
चंचल तेची तू स्वामिनी
अबला न तू असे कामिनी
विद्युलता तू दामिनी //
वाहीशी खळाळत झर्यासवे
सळसळनार्या वार्यासवे
विहारीशी तू आनंदाने
किलबिलणाऱ्या थव्यासवे //
कोमलांगी,सुगंधा
लतिका, मृग्नयाना
तरसली सारी अवनी
फक्त तुझ्या दर्शना //
मृदुभाषिणी तू ललना
पुष्प लता तू अर्चना
सहचारिणी माझी
भेटलीस मज पामराला //----आकांक्षित
No comments:
Post a Comment