केव्हातरी
उत्तुंग शिखरांच्या उंची एव्हडी
माझीही होईल उंची केव्हातरी //
माझेही नाव लोक उराशी बाळगतील
मीही होईन कोणाचीतरी स्फूर्ती केव्हातरी //
सौंदर्याने नटलेल्या, प्रकाशाने उजळलेल्या
माझ्याही असतील इमारती ,केव्हातरी //
मग रस्त्याने जाता जाता सरस्वतीच्या मंदिरी
वाहील फुले हा विद्यार्थी केव्हातरी // ------ आकांक्षित
No comments:
Post a Comment