भक्ती
देव भक्तीचा भुकेला
बोले रागावून मला
का रे तू असा
विसरलास मला //
ऐकुनी त्याचे बोल हे
भारावलो मी
तुझ्या प्रीतीच्या भावनेत
देवाला विसरलो मी //
मला लागली तहान
तुला भेटण्याची आस
चंद्रावानी रूप तुझे
मला पाहण्याची आस //
रागे रागे देवा माझ्या
नको जावूस तू आज
प्रेमामध्ये देवा माझ्या
तुझ्या भक्तीचाच वास //
देव आनंदुनी गेला
म्हणे आहेस तू साधा
जन्मोजन्मी मिळावी
तुला हीच तुझी राधा //--- - मंगेश वाडते ( आकांक्षित )
Very nice.
ReplyDelete